Navneet Rana : नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी- बाबा सिद्दिकीसारखीच तुमची हत्या करू, पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांच्या 112 क्रमांकावर फोन करत बाबा सिद्दिकी सारखीच नवनीत राणा यांची हत्या करू, अशी धमकी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पूर्वी देखील नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.