Zubeen Garg : गायक जुबीन गर्ग प्रकरणात 3500 पानांचे आरोपपत्र दाखल; पुरावे चार ट्रंकमध्ये भरून न्यायालयात आणले
आसामचे गायक जुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणी विशेष तपास पथकाने (SIT) शुक्रवारी गुवाहाटी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी (CJM) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सुमारे 3,500 पानांचे हे आरोपपत्र आणि त्यासंबंधीचे पुरावे चार ट्रंकांमध्ये भरून न्यायालयात आणण्यात आले. नऊ सदस्यीय SIT सहा गाड्यांच्या ताफ्यासह न्यायालयात पोहोचली. या प्रकरणात आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे.