LPG Gas : मोबाईल नंबरप्रमाणे गॅस कंपनीही बदलता येणार; सध्या फक्त डीलर बदलण्याची सुविधा
लवकरच तुम्ही मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीप्रमाणेच तुमचे गॅस कनेक्शन कोणत्याही कंपनीला स्विच करू शकाल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने (पीएनजीआरबी) यासाठी तयारी सुरू केली आहे. यामुळे ग्राहकांना अधिक पर्याय मिळतील आणि सेवा सुधारतील.