Dawoodi Bohra : दाऊदी बोहरा शिष्टमंडळाने पंतप्रधान मोदींची भेट घेतली, वक्फ कायद्याचे केले स्वागत
दाऊदी बोहरा समुदायाच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संसदेने मंजूर केलेल्या वक्फ दुरुस्तीचे शिष्टमंडळाने स्वागत केले आणि हा कायदा मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले. या समुदायाच्या मुख्य मागण्या या कायद्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.