Darul Uloom Deoband : दारुल उलूम देवबंदमध्ये महिला आणि मुलांना प्रवेश बंदी!
विद्यार्थ्यांच्या प्रवेश आणि परीक्षांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील दारुल उलूम देवबंद व्यवस्थापनाने पुन्हा एकदा देवबंदमध्ये महिला आणि मुलांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. दारुल उलूम प्रशासनाने सर्व अभ्यागतांना लहान मुले आणि महिलांना सोबत आणू नये असे आवाहन केले आहे. याबाबत दारुल उलूम कॅम्पसबाहेर एक नोटीसही चिकटवण्यात आली आहे.