Vedamurti Devavrat Rekhe, : 50 दिवसांत कठीण ‘दंडक्रम पारायण’ केले पूर्ण, अहिल्यानगरच्या वेदमूर्ती देवव्रत रेखेंचे PM नरेंद्र मोदींकडून कौतुक
अहिल्यानगर जिल्ह्यातील एका 19 वर्षीय तरुणाने आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने आणि कठोर साधनेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधून घेतले आहे. वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे असे या तरुणाचे नाव असून, त्याने काशी (वाराणसी) येथे अत्यंत कठीण मानले जाणारे ‘दंडक्रम पारायण’ पूर्ण केले आहे. त्याच्या या अद्वितीय कामगिरीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट करत त्याचे भरभरून कौतुक केले आहे.