CM Fadnavis : शरद पवार म्हणाले- महाराष्ट्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान; अजितदादांचा मृत्यू हा निव्वळ अपघात, कृपा करून इथे राजकारण आणू नये
अजित पवार हे महाराष्ट्राचे लोकनेते होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता. अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या निधनावर भावना व्यक्त केल्या आहेत. ज्याच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड आस्था होती. अजित दादा हे अतिशय संघर्षातून तयार झालेले अशा प्रकारचे नेतृत्व होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणारे व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्राकरता आजचा दिवस अतिशय कठीण दिवस आहे. अशा प्रकारचे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्षे लागतात, असे देखील फडणवीस म्हणाले.