Bangladesh : बांगलादेशमध्ये भारतीय वकिलातीवर हल्ला, हिंदू तरुणाची हत्या; प्रेत जाळले, भारतविरोधी विद्यार्थी नेता हादीच्या मृत्यूनंतर हिंसाचार
शरीफ हादीच्या मृत्यूच्या निषेधार्थ इन्कलाब मंच आणि जमातच्या कट्टरपंथीयांनी बेनापोलपासून भारतीय सीमेपर्यंत मोर्चा काढला. त्यांनी माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशकडे देण्याची मागणी केली. दरम्यान, चट्टोग्राममध्ये, कट्टरपंथीयांनी चंद्रनाथ मंदिराबाहेर धार्मिक घोषणा दिल्या. ढाक्यामधील प्रतिष्ठित ढाकेश्वरी मंदिराच्या संरक्षणासाठी अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. कट्टरपंथीयांनी ढाक्यामधील तोफखाना रोडवरील शिल्पी गोष्ठी सांस्कृतिक केंद्रालाही घेराव घालत घोषणाबाजी केली. दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी हादीचा मृतदेह सिंगापूरहून ढाका येथे आणण्यात आला. युनूस सरकारने शनिवारी राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. शनिवारी हादीवर अंत्यसंस्कार केले जातील.