Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका, फुकटचा ताठा अन् नाव उबाठा; खरे दगाबाज कोण हे जनतेने ओळखले!
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी अनुदानाच्या मुद्यावरून मराठवाड्याचा दौरा करत महायुती सरकारवर ‘दगाबाज’ म्हणत टीका केली होती. या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा दौऱ्यावर असताना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कोणी बांधली? खरे दगाबाज कोण हे जनतेने ओळखले आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला. तसेच, ठाकरेंनी मराठवाड्याचा दौरा करताना शेतकऱ्यांना ‘एक बिस्किटचा पुडाही’ दिला नाही, अशी खोचक टीका करत ‘फुकटचा ताठा अन् नाव उबाठा’ असा उपरोधिक हल्लाबोलही केला.