G20 Declaration : अमेरिकेच्या बहिष्कारानंतरही G20 घोषणापत्र मंजूर; दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्रम्पची मागणी नाकारली
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहिष्काराला न जुमानता, सदस्य देशांनी शनिवारी, G20 शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने तयार केलेल्या घोषणेस एकमताने मान्यता दिली. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा म्हणाले की, अमेरिका सामील झाली नसली तरी, अंतिम निवेदनावर सर्व देशांचे एकमत होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.