Cyber attack : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सायबर हल्ला!
सोमवारी अमेरिका आणि ब्रिटनमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) च्या सेवा काही काळासाठी बंद होत्या. इंटरनेट सेवांच्या खंडिततेचा मागोवा घेणाऱ्या वेबसाइट Downdetector.com नुसार, अमेरिकेतील २१,००० हून अधिक युजर्सनी आणि यूकेमधील १०,८०० हून अधिक युजर्सनी या अडचणीबाबत तक्रार केली आहे. अहवालांनुसार, वापरकर्त्यांना X वर संदेश पाठवताना, ट्विट पोस्ट करताना आणि टाइमलाइन रिफ्रेश करताना समस्या येत होत्या.