Cult of Fear : कल्ट ऑफ फिअर माहितीपटावरून डिस्कव्हरी चॅनेलवर दबाव, कर्मचारी घरांमध्ये लपले, महिलांना रेपच्या धमक्या
डिस्कव्हरीने लोकांना दाखवलेल्या आसारामच्या ‘कल्ट ऑफ फिअर’ची कहाणी खुद्द कर्मचारीच अनुभवत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्कव्हरी प्लसचे कर्मचारी आसाराम समर्थकांच्या दहशतीमुळे भीतीखाली वावरत आहेत. भीतीदेखील अशी की १०० हून अधिक कर्मचारी कार्यालयात येत नाहीत आणि ते त्यांच्या घरातच बंदिस्त आहेत.