CSDS’ Sanjeev Kumar : खाेट्या आकडेवारीमुळे काॅंग्रेसवर ताेंडावर पडण्याची वेळ, सीएसडीएसचे संजीव कुमार यांनाही मागावी लागली माफी
राजकारणात आकडेवारी ही सर्वात धारदार शस्त्र असते. पण तीच आकडेवारी चुकीची ठरली तर? काँग्रेस प्रवक्ते पवन खेऱा आणि सीएसडीएसचे संजय कुमार यांना या प्रश्नाचे उत्तर मिळाले. सहा महिन्यांत मतदार यादीत तब्बल ४० टक्के घटवाढ झाली असल्याचा त्यांचा दावा ४८ तासांत कोसळला आणि माफी मागण्याची वेळ आली.