CRPF jawan’s wife : CRPF जवानाच्या पत्नीला पाकिस्तानात पाठवले जाणार नाही; न्यायालयाने हद्दपारीला स्थगिती दिली
जम्मूमध्ये तैनात असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवान मुनीर खान यांच्या पाकिस्तानी पत्नी मीनल अहमद खान यांना पाकिस्तानात पाठवण्यात आले नाही. मंगळवारी त्यांना अमृतसरमधील अटारी सीमेवर नेण्यात आले जिथून त्यांना पाकिस्तानला पाठवण्यात येणार होते, परंतु न्यायालयाने त्यांच्या हद्दपारीला स्थगिती दिली.