India Slams : इम्रान खान तुरुंगात, आसिम मुनीरला मोकळीक; भारताने UN मध्ये पाकिस्तानला फटकारले
भारताने मंगळवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) खुल्या चर्चेदरम्यान पाकिस्तानवर तीव्र टीका केली. राजदूत हरीश पर्वतनेनी यांनी पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत राजकीय अस्थिरतेला त्याच्या सीमापार दहशतवादाच्या दीर्घ इतिहासाशी जोडले.