Manoj Jarange : मनोज जरांगे यांची मोठी घोषणा- मराठा आरक्षणानंतर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आंदोलन उभारणार
मराठा आरक्षणासाठी राज्यात रान पेटवणारे मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मैदानात उतरले आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये झालेल्या मोठ्या नुकसानीनंतरही शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली नसल्याने, जरांगे पाटलांनी थेट भाऊबीजेच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभारण्याचा इशारा सरकारला दिला आहे.