Laxman Hake : लक्ष्मण हाकेंची जहरी टीका- अजित पवार तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता, कारखाना चालवण्याशिवाय दुसरे काय जमते?
राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाबाबतीतल्या मागण्या मान्य केल्यानंतर राज्यातील ओबीसी समाज दुखावला गेल्याचे बोलले जात आहे. तसेच मंत्री छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे दाखवून दिली आहे. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके हे सातत्याने पवार कुटुंबावर टीका करत आहेत. शरद पवारांनीच जरांगे नावाचे भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवले असल्याची टीका त्यांनी शुक्रवारी केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.