Taliban : तालिबान नेत्यांविरुद्ध इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाचे अटक वॉरंट; महिलांवरील अत्याचाराचे आरोप
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) ८ जुलै रोजी तालिबानचे सर्वोच्च नेते हिबतुल्ला अखुंदजादा आणि अफगाणिस्तानचे मुख्य न्यायाधीश अब्दुल हकीम हक्कानी यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले.या दोघांवरही अफगाण महिला, मुली आणि तालिबानच्या कठोर लिंग धोरणांना विरोध करणाऱ्यांवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. हे वॉरंट मानवतेविरुद्धच्या गुन्ह्याखाली जारी करण्यात आले आहेत.