Pune : पुण्यात मध्यरात्री रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा; 100 हून अधिक तरुण-तरुणी ताब्यात, दारू-गांजा जप्त
पुण्यातील मुळशी परिसरात सुरू असलेल्या एका कथित रेव्ह पार्टीवर पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई केली. या छाप्यात 100 हून अधिक तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून मोठ्या प्रमाणात मद्यसाठा, गांजा आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.