Durgapur : पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीवर गँगरेप; मित्रासोबत जेवायला गेली होती; परतताना तरुणांनी रस्ता अडवला, अत्याचार केले
पश्चिम बंगालमधील पश्चिम वर्धमान जिल्ह्यातील दुर्गापूर येथे शुक्रवारी एका वैद्यकीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला. पीडिता तिच्या एका पुरुष मित्रासोबत जेवायला बाहेर गेली होती. परत येत असताना काही तरुणांनी त्यांचा रस्ता अडवला. त्यानंतर त्यांनी तिच्या मित्राला पळवून लावले आणि विद्यार्थिनीवर बलात्कार केला.