Thackeray Group : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांना ठाकरे गटाचा विरोध; संजय राऊत यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र
आशिया कप 2025 स्पर्धेमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामने होणार आहेत. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट सामने खेळण्यास विरोध केला आहे. या संदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपला विरोध दर्शवला आहे.