Bengaluru : बंगळुरूत देशातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम बांधले जाणार; 80,000 प्रेक्षक क्षमता; RCB चेंगराचेंगरी घटनेनंतर निर्णय
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरूजवळ एक नवीन क्रिकेट स्टेडियम बांधण्याची घोषणा केली आहे. या स्टेडियममध्ये एका वेळी ८० हजार प्रेक्षक बसू शकतील. प्रेक्षक क्षमतेच्या बाबतीत, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमनंतर हे देशातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असेल.