• Download App
    CP Radhakrishnan | The Focus India

    CP Radhakrishnan

    CP Radhakrishnan : सीपी राधाकृष्णन यांनी 15 वे उपराष्ट्रपती म्हणून घेतली शपथ; समारंभाला उपस्थित राहिले जगदीप धनखड

    नवनिर्वाचित उपराष्ट्रपती चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन यांनी १५ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. ओडिशा आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे देखील उपस्थित होते.

    Read more

    Devendra Fadnavis : उपराष्ट्रपती निवडणूक निकालावरून CM फडणवीसांचा टोला- विरोधक तोंडावर पडले, त्यांना स्वत:ची मते राखता आली नाहीत

    उपराष्ट्रपती निवडणुकीच्या निकालांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. निवडणुकीआधी विरोधकांनी विनाकारण बडबोलेपण केले. ते जास्त बोलले. एनडीएचे मते फोडू असे सांगितले. पण उलटेच झाले. विरोधकांना स्वत:ची मते देखील राखता आली नाहीत, हे या निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. त्यांची मोठी संख्या आमच्या एनडीए उमेदवाराला गेली आहे. विनाकारण काहीतरी वातावरण तयार करायचे आणि तोंडावर पडायचे, अशी अवस्था विरोधकांची आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

    Read more

    CP Radhakrishnan : सीपी राधाकृष्णन देशाचे 15वे उपराष्ट्रपती असतील; NDA उमेदवाराला 452 मते मिळाली

    सीपी राधाकृष्णन हे देशाचे १५ वे उपराष्ट्रपती असतील. एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन यांना ४५२ पहिल्या पसंतीची मते मिळाली. तर आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना ३०० पहिल्या पसंतीची मते मिळाली. राधाकृष्णन १५२ मतांच्या फरकाने विजयी झाले.

    Read more

    Vice President Election : आज उपराष्ट्रपती निवडणूक, राधाकृष्णन आणि रेड्डी यांच्यात लढत; नवीन पटनायक आणि केसीआर यांच्या पक्षांची माघार

    मंगळवारी देशाला १५ वे उपराष्ट्रपती मिळणार आहेत. एनडीएने ६८ वर्षीय सीपी राधाकृष्णन यांना तर भारताने ७९ वर्षीय बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ७८१ खासदार संसदेत मतदान करतील. मतमोजणी सायंकाळी ६ वाजता सुरू होईल. त्यानंतर निकाल जाहीर केले जातील.

    Read more

    CP Radhakrishnan : उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक- NDA उमेदवार राधाकृष्णन यांचा अर्ज दाखल; मोदी पहिले प्रस्तावक

    एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यापूर्वी त्यांनी संसदेच्या परिसरात असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केले. त्यांच्यासोबत २० प्रस्तावक आणि २० समर्थकांसह सुमारे १६० सदस्य उपस्थित होते. उपराष्ट्रपती पदासाठी ९ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे.

    Read more

    CP Radhakrishnan Profile : तामिळनाडूत जन्म, 16 वर्षे वयापासून RSS मध्ये, 2 वेळा खासदार, तमिळनाडू भाजपाध्यक्षही होते

    महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार असतील. रविवारी झालेल्या भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत झाले. नड्डा यांनी पत्रकार परिषदेत राधाकृष्णन यांचे नाव जाहीर केले.

    Read more

    CP Radhakrishnan उपराष्ट्रपती पदासाठी मोदींचे पुन्हा सरप्राईज; यादीतली सगळे नावे बाजूला; महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन यांना संधी!!

    राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सतत धक्के देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत वेगळा धक्का दिला.

    Read more