Eknath Shinde : शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार- मुंबई लुटणाऱ्यांनी अमित शहांवर बोलू नये; स्वत:चे पायपुसणे करून घेणाऱ्यांना टीका करायचा अधिकार नाही
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “कोविड काळात मड्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांनी आणि मुंबई लुटणाऱ्यांनी अमित शहा यांच्यावर बोलणे ही मोठी शोकांतिका आहे,” अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला. तसेच स्वत:चे पायपुसणे करून घेणाऱ्यांना दुसऱ्यावर टीका करायचा अधिकार नाही, असेही ते म्हणाले.