Sameer Wankhede : समीर वानखेडेंची हायकोर्टात याचिका, म्हणाले- आर्यन खानच्या सिरीजमध्ये माझी बदनामी, 2 कोटींच्या भरपाईची मागणी
कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आलेले एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे आणि अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटला आहे. आर्यन खानने दिग्दर्शित केलेल्या “बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेब सीरिजविरोधात वानखेडेंनी थेट दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या सिरीजमध्ये आपली बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला.