Uddhav Thackeray : EC अन् न्यायालयावर न बोललेलेच बरे; उद्धव ठाकरे यांचे हायकोर्टाच्या आदेशावर भाष्य
निवडणूक आयोग व न्यायालयावर न बोललेलेच बरे, अशा मोजक्या शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या मतमोजणी पुढे ढकलण्याच्या आदेशाचा खरपूस समाचार घेतला. या प्रकरणी आदित्य ठाकरे पक्षाची भूमिका मांडतील, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंना महायुतीत कुणीही विचारत नसल्याचाही दावा केला. सध्या त्यांना (शिंदे) तिकडे कोणती किंमत देत नाही. भाजप आता सरळ सांगत आहे की, फक्त नंबर 1 ला महत्त्व असते, नंबर 2 वगैरे काहीही नसते, असे ते म्हणाले.