Pune Rave Party : रेव्ह पार्टीत पोलिसांनीच अंमली पदार्थ प्लांट केले; प्रांजल खेवलकरांच्या वकिलांचा युक्तिवाद, राजकीय षड्यंत्रचा आरोप
शहरातील खराडी परिसरात एका उच्चभ्रू गेस्ट हाऊसवर सुरू असलेल्या हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकत सात जणांना अटक केली आहे. ‘स्टे बर्ड’ नावाच्या गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या या पार्टी दरम्यान, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, दारू आणि हुक्के जप्त केले आहेत.