Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाण म्हणाले- ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही, म्हणून एका मिनिटांत खटला संपला
शिवसेनेच्या वकिलांना चिन्हाच्या खटल्यामध्ये कोर्टात चुकीचे मुद्दे मांडल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. एका मिनिटांमध्ये हा खटला संपला, निवडणुका झाल्या नाहीत हा मुद्दा मांडायला हवा होता, तो मांडला गेला नाही, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. तर स्थानिक निवडणुका होण्यापूर्वी तुम्ही आम्हाला चिन्हाबाबत लवकर निर्णय द्या असेही म्हणायला हवे होते असे चव्हाणांनी म्हटले आहे.