Bengaluru : बंगळुरूत जोडप्याने फूड डिलिव्हरी एजंटला चिरडले; स्कूटर कारला खेटून गेल्याने 2 किमी पाठलाग करून धडक
बंगळुरूमध्ये एका जोडप्याने त्यांच्या कारने एका फूड डिलिव्हरी एजंटला चिरडून ठार मारले. ही घटना २५ ऑक्टोबर रोजी जेपी नगर परिसरात घडली, परंतु बंगळुरू पोलिसांनी बुधवारी रोड रेजची घटना नोंदवली. पोलिसांनी सांगितले की, आरोपी मनोज हा केरळचा आहे आणि त्याची पत्नी आरती ही जम्मू आणि काश्मीरची आहे.