Shashi Tharoor : शशी थरूर म्हणाले- पहिली निष्ठा पक्षाशी नाही तर देशाशी; देशाच्या सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा सर्व पक्षांनी एकत्र काम करावे
काँग्रेस नेते आणि तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर म्हणाले की, कोणत्याही नेत्याची पहिली निष्ठा पक्षाशी नाही तर देशाशी असली पाहिजे. शनिवारी कोची येथे ‘शांतता, सौहार्द आणि राष्ट्रीय विकास’ या विषयावरील कार्यक्रमात थरूर बोलत होते.