Pakistan’s Defense Minister : पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांची कबुली- देशातील अर्धे अधिकारी भ्रष्ट; पोर्तुगालमध्ये प्रॉपर्टी खरेदी करून पाक सोडण्याची तयारी
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी बुधवारी देशाच्या सर्वोच्च नोकरशाहीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. त्यांनी बुधवारी सांगितले की, पाकिस्तानच्या अर्ध्याहून अधिक अधिकाऱ्यांनी पोर्तुगालमध्ये मालमत्ता खरेदी केली आहे आणि ते तेथील नागरिकत्व घेण्याची तयारी करत आहेत.