Gautam Adani : अदानींची 3,050 कोटींची मोठी डील; भारतातील सर्वात मोठी स्मार्ट मीटर कंपनी बनली
गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील Adani Energy Solutions ने देशातील आघाडीची स्मार्ट मीटर कंपनी इंटेलीस्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चरचे 100% अधिग्रहण करण्याची घोषणा केली आहे. या व्यवहाराची किंमत तब्बल 3,050 कोटी रुपये असून या डीलनंतर अदानी समूह भारतातील सर्वात मोठा स्मार्ट मीटर प्लॅटफॉर्म बनणार आहे.