Eknath Shinde : एकनाथ शिंदे, पवार यांच्यासह तब्बल 20 नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये; राज्य निवडणूक आयोगाने मागवला अहवाल
राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्षांतच चढाओढ दिसून आली. प्रचारसभांमध्ये एकमेकांवर कुरघोड्या आणि टीकाटिप्पणी करण्याची स्पर्धा सुरू असताना मतदारांना प्रलोभने देणारी महायुतीतील बड्या नेत्यांच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मंत्री गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, जयकुमार गोरे, भाजप आमदार चित्रा वाघ यांच्यासह एकूण २० जणांच्या भाषणांची निवडणूक आयोगाकडून तपासणी होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने जिल्हाधिका-यांकडून अहवाल मागवला आहे. त्यामुळे मतदारांना आकर्षित करणारी वक्तव्य महायुतीतील बड्या नेत्यांना भोवण्याची शक्यता आहे.