Maharashtra Govt : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराचे नवे नियम; महाराष्ट्र शासनातर्फे निर्देश जारी
सोशल मीडियाचा वापर सर्वत्रच मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यावर लोक आपले खासगी आयुष्यातील क्षण तसेच फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. परंतु, आता महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापरासाठी काही नियमावली व महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. सामान्य प्रशासन विभागाने (GAD) नुकतेच हे दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यामुळे कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला सरकारवर टीका करणे किंवा धोरणांबद्दल नकारात्मक टिप्पणी करणे महागात पडणार आहे.