CM Fadnavis : CM फडणवीस मालेगाव निकालावर म्हणाले- UPA चे षडयंत्र उघडे पडले, काँग्रेसने हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी
विशेष एनआयए कोर्टाने मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी दिलेल्या निर्णयामुळे काँग्रेस प्रणित तत्कालीन यूपीए सरकारच्या षडयंत्राचा पर्दाफाश केला, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी या निकालावर भाष्य करताना केला. काँग्रेस व यूपीए सरकारने एक षडयंत्र रचून हिंदू व भगवा दहशतवादाचा खोटा प्रचार केला. या प्रकरणी त्यांनी संपूर्ण हिंदू समाजाला दहशतवादी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी जाहीर माफी मागितली पाहिजे, असे ते म्हणाले.