Trump : ट्रम्प म्हणाले- पत्रकार परिषद घेतली नाही, म्हणूनच मृत्यूची अफवा पसरली, सोशल मीडियावर ट्रेंड झाले ‘ट्रम्प इज डेड’
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी त्यांच्या मृत्यूच्या अफवांची खिल्ली उडवली. ट्रम्प यांनी माध्यमांना सांगितले की, ते पत्रकार परिषदेला उपस्थित राहू शकत नाहीत आणि म्हणूनच त्यांच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या.