Surat Court : सहमतीच्या संबंधांनंतर लग्नास नकार हा बलात्कार नाही; सुरत सत्र न्यायालयाने म्हटले- मुलीने हॉटेलमध्ये ओळखपत्र दिले, त्यामुळे जबरदस्ती झाली नाही
लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अनेक वेळा बलात्कार केल्याच्या तक्रारीच्या सुनावणीदरम्यान सुरत सत्र न्यायालयाने गुरुवारी आरोपीला निर्दोष सोडले. न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, सहमतीने शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लग्न करण्यास नकार देणे हा बलात्काराचा गुन्हा नाही.