जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसच्या 16 आमदारांचा पाठिंबा; पण केंद्रीय नेते नाराज झाल्याचा दावा!!
महाराष्ट्रात फडणवीस सरकारने जन सुरक्षा कायदा विधानसभेत मंजूर करून घेतला त्यावेळी विरोधी पक्षांपैकी फक्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी त्या कायद्याला अधिकृतपणे विरोध केला त्यांचे विरोधी मत विधानसभा अध्यक्षांना नोंदवावे लागले. त्यामुळे तो कायदा आवाजी मतदानाने मंजूर झाला असला तरी तो एकमताने मंजूर झाल्याचा दावा सरकारला करता आला नाही.