Sharad Pawar : शरद पवारांची कबुली- वसंतदादांचे सरकार आम्ही पाडले, त्याच दादांनी मला मुख्यमंत्री केले
वसंतदादा हे आमचे नेते होते, मात्र ते इंदिरा काँग्रेसमध्ये होते आणि आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी प्रेरित होतो. निवडणुकीनंतर दोन्ही काँग्रेस पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापनेचा प्रयत्न करत होते. मात्र आम्हा तरुणांचा त्या एकत्रीकरणाला विरोध होता. त्यामुळे आम्ही वसंतदादांचे सरकार घालवायचे ठरवले आणि ते घालवलं. त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो, अशी थेट कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.