Election Commission : बिहार SIR :हटवलेल्या नावांची यादी वा कारण देणे बंधनकारक नाही, निवडणूक आयोगाचे कोर्टात उत्तर
बिहारमध्ये सुरू असलेल्या सखोल मतदार पुनरीक्षणावर (एसआयआर) निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात उत्तर सादर केले. आयोगाने म्हटले की, प्रारूप मतदार यादीतून बाहेर झालेल्या मतदारांची वेगळी यादी बनवणे वा त्यांची नावे समाविष्ट न करण्याची कारणे सांगणे वर्तमान कायद्यात बंधनकारक नाही.