Priyanka Gandhi : प्रियांका गांधींची सुप्रीम कोर्टाच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया, म्हणाल्या- खरा भारतीय कोण, हे जज ठरवणार नाहीत
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मंगळवारी संसदेच्या आवारात सांगितले की, ‘माननीय न्यायाधीशांचा पूर्ण आदर करून मी हे सांगू इच्छिते की- खरे भारतीय कोण, हे ते ठरवू शकत नाहीत.”सरकारला प्रश्न विचारणे हे विरोधी पक्षनेत्याचे कर्तव्य आहे. माझा भाऊ कधीही सैन्याविरुद्ध बोलणार नाही, त्याला त्यांच्याबद्दल आदर आहे. माझ्या भावाच्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावण्यात आला.’