Colonel Sophia Qureshi : कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान मंत्र्याला भाेवले, न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल
ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणारे मध्य प्रदेशातील भाजप सरकारमधील कॅबिनेट मंत्री विजय शाह यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची दखल घेत न्यायालयाने तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि रात्री 11.15 वाजता विजय शाह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.