Girish Mahajan : मराठा आरक्षणाच्या जीआरचा निर्णय सरकारचा; कोणाला टार्गेट करणे योग्य नाही, भुजबळांच्या टीकेनंतर विखेंच्या साथीला गिरीश महाजन
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बीडमधील महाएल्गार सभेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर तिखट टीका केली होती. विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. गेला तर गेला पण जीआर काढला, असे भुजबळ म्हणाले होते. आता यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत राधाकृष्ण विखे पाटलांची बाजू घेतली. जीआरचा निर्णय हा वैयक्तिक नसून समितीचा सामूहिक निर्णय होता. त्यामुळे कोणालाही टार्गेट करणे योग्य नाही, असे गिरीश महाजन म्हणाले.