Rahul Narwekar : संजय राऊतांना पराभव दिसू लागल्याने बिनबुडाचे आरोप; उमेदवारांना धमकावल्याच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचा पलटवार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या गोंधळावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहेत. संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांवर उमेदवारांना धमकावल्याचा आरोप केल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. “ज्यांना वेळेत उमेदवारी अर्ज भरता आले नाहीत, त्यांनी आपल्या नियोजनातील त्रुटी मान्य कराव्यात, बिनबुडाचे आरोप करू नयेत,” असा टोला नार्वेकर यांनी लगावला.