Monsoon Session : पावसाळी अधिवेशनात बिहार SIR मुद्द्यावर विरोधकांचा गदारोळ, कोस्टल शिपिंग विधेयक राज्यसभेत मंजूर
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या १५व्या दिवशी बिहार एसआयआरवर चर्चा व्हावी या मागणीसाठी विरोधी पक्षांनी निदर्शने केली. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभर चालले नाही.गुरुवारीही, विरोधकांच्या गदारोळात राज्यसभेत कोस्टल शिपिंग विधेयक, २०२५ मंजूर करण्यात आले. त्याचा उद्देश भारतीय किनारपट्टीवर मालवाहतूक सुलभ करणे आहे. हे विधेयक ३ एप्रिल रोजी लोकसभेत मंजूर करण्यात आले.