Tamil Nadu : तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा, 5 जिल्ह्यांतील शाळा बंद; चेन्नईच्या मरिना बीचवर वादळाचा धोका
ईशान्य मान्सूनमुळे गेल्या दोन दिवसांपासून दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. बुधवारी तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारपासून राज्यातील तिरुवल्लूर, चेन्नई, कांचीपुरम, चेंगलपट्टू आणि डेल्टा जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू आहे.