Coal production : कोळसा उत्पादनाने १०० दशलक्ष टनांचा आकडा ओलांडला
भारतात पहिल्यांदाच कोळसा उत्पादनाने १०० दशलक्ष टनांचा आकडा ओलांडला आहे. शुक्रवारी सोशल मीडिया साइट X वर ही माहिती देताना कोळसा मंत्री जी कृष्णा रेड्डी यांनी लिहिले की, “एक अब्ज टन कोळसा उत्पादन साध्य झाले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कार्यक्षम प्रक्रियेमुळे हे शक्य झाले आहे. ही उपलब्धी आपल्याला विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यास आणि आर्थिक प्रगती राखण्यास मदत करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत ऊर्जा क्षेत्रात जागतिक नेता बनेल.”