Indigo : इंडिगो विमानात सहवैमानिकाने जबरदस्तीने शौचालयात प्रवेश केल्याचा प्रवाशाचा आरोप; एअरलाइनने नंतर माफी मागितली
मुंबईतील एका महिला प्रवाशाने इंडिगो विमानाने तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. सेफगोल्ड (गिटल गोल्ड प्लॅटफॉर्म) च्या सह-संस्थापक रिया चॅटर्जी यांनी लिंक्डइन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, ती उड्डाणादरम्यान शौचालयात गेली होती, त्यादरम्यान सह-वैमानिकाने शौचालयाचा दरवाजा उघडला आणि तिच्याकडे पाहू लागला.