• Download App
    CM Statement | The Focus India

    CM Statement

    CM Fadnavis : डॉक्टर आत्महत्येप्रकरणी CM फडणवीसांनी माजी खासदारांवरील आरोप फेटाळले; रणजितसिंह निंबाळकरांचा काही संबंध नाही

    सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या तरुण महिला डॉक्टरच्या मृत्यूने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव समोर आले होते. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे निंबाळकरांवरील आरोप फेटाळून लावले आहेत. डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रणजितसिंह निंबाळकरांचा काहीही संबंध नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    Read more

    Narayan Rane : नारायण राणेंनी टोचले नितेश राणेंचे कान- मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो, तो जनतेचा सेवक असतो!

    मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो. मी नितेशला समज दिली आहे, असे भाजप खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे. भाजप आमदार व मंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी धाराशिव येथे बोलताना महायुतीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावरून महायुतीमध्ये अंतर्गत वाद पेटला होता. त्यानंतर नीलेश राणे यांनी देखील ट्विट करत नितेश राणे यांना विधाने जपून करावीत असा सल्ला दिला होता. आता नारायण राणे यांनी देखील समज दिल्याचे समजते.

    Read more