CM Omar : पहलगाम हल्ल्यावर CM ओमर म्हणाले- सुरक्षा माझी जबाबदारी होती; माफी मागण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत
सोमवारी जम्मू-काश्मीर विधानसभेत पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले – यजमान असल्याने सुरक्षेची जबाबदारी माझ्यावर होती. या लोकांच्या कुटुंबियांची मी कशी माफी मागू? माझ्याकडे शब्द नाहीत.